काटी , दि.०४: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गणात  पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता शिंदे  व मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई,एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि . 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीत  तामलवाडीसह, पिंपळा(बु.), पिंपळा (खु.), देवकुरुळी, सुरतगाव, सांगवी (काटी) या गावात झालेल्या  मोफत नेत्ररोग शिबीरात एकुण 713 रुग्णाची तपासणी करण्यात आली .तर 90 मोतीबिंदु रुग्ण आढळले असुन त्याच्यावर पुणे येथे लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


  तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता. आठवडाभर चाललेल्या या शिबिरात डॉ. अजित यादव, डॉ. अखिलेश संता  यांनी तपासणी करून या शिबिरात तामलवाडी येथे 165 रुग्णांची, सुरतगाव 85, सांगवी (काटी),पिंपळा खुर्द 100, पिंपळा बुद्रुक 100 आणि देवकुरुळी 118 अशा एकूण 713 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण 90 मोतिबिंदू रुग्ण आढळले असून लवकरच त्यांच्यावर पुणे येथील एच.व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे  दत्ता शिंदे यांनी सांगितले.
   

शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ  रविकांत गुरव,बसवेश्वर मसुते, सुधाकर लोंढे, नागनाथ मसुते, सतिश माळी, सुधीर गायकवाड विठ्ठल गुंड,बाबासाहेब गुंड, राम गुंड, बोचरे गजेंद्र, राजू गुंड,मिलिंद मगर,शरद मगर, भीमा भुईरकर, धनाजी कदम, तानाजी पाटील,लखन कदम, सुमीत शिंदे, शंकर पाटील, सुदर्शन बनकर, विजय जाधव, बालाजी चुंगे, सीताराम पाटील, संग्राम राजेपांढरे, धनाजी पाटील ,बालाजी जाधव, हणमंत जाधव, कुमार जाधव, अण्णासाहेब जाधव, आदिनाथ जाधव, राहुल खलाटे, यांच्यासह तामलवाडी पंचायत समिती गणातील सर्व सरपंच उपसरपंच ,सदस्य,
ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मोलाचे योगदान दिले.
 
Top