उमरगा,दि . ०४
देशाच्या विकासात बुद्धीमान
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान असून. शालेय जीवनातच विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची गोडी लावून आदर्श प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे. असे विचार उमरगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कुलदीप कांबळे यांनी व्यक्त केले
तालुक्यातील येणेगूर येथे विवेक वर्धनीय सामाजिक संस्था उमरगा याच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्य हायटेक इंग्लीश स्कूल येथे आरोग्य शिबीर ब पालक मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षीय स्थानावरुन कुलदीप कांबळे हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईचे मराठवाडा विभाग प्रमूख सदाशीव साबळे व संस्थेचे प्रकाश कंटेकुरे हे उपस्थित होते
यावेळी येणेगूरचे सरपंच सौ सुनंदा माळी. उपसरपंच राहुल बनसोडे , सामाजीक कार्यकर्ते विश्वनाथ स्वामी श्रीहरी बोडके, नंदू पवार, प्रथम संस्थेचे सुमीत कोथिंबीरे व दिनेश धुळे हे उपस्थित होते.
यावेळी सदाशिव साबळे यांनी देशात बेरोजगाराची भिषण समस्या निर्माण झाली असून प्रथम संस्थेने देशात या समस्येवर मात करणेसाठी मोफत कौशल्य विषयक प्रशिक्षण
देउन, देशातील नामवंत कंपनीत रोजगार मिळवून देण्यात येणार असून तालुक्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळी डॉ नचिकेत इनामदार यांनी सध्या उन्हाचे तपमान वाढले असून पालकांनी आपल्या बालकांची योग्य ती घबरदारी घेवून उन्हापासून रक्षण करावे. यावेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 560 रुग्णांची तपासनी करण्यात आली. यासाठी डॉ नचिकेत इनामदार ,डॉ सुनिल टिकंबरे ,डॉ स्वरा
कलशेट्टी, डॉ प्रज्ञा कुरुम, डॉ सचिन कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी हायटेक इलिश स्कूलच्या
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत पारितोषिक मिळवल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका सरस्वती मोरे यांना मेस्टा संस्थेतर्फे राज्यस्तरीय बेस्ट हेडमास्टरचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मानित करणयात आला.
कायक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती मोरे यांनी सुत्रसंचलन शुंभागी वाघमाडे व अमित रेड्डी यांनी केले. अभार रेखा गुंजोटे मानले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जरीन शेख, अलका हिंगमीरे, माधुरी चेंडके, प्रमिला पांचाळ, लक्ष्मी वाले, सामिना शेख ,अंजली महानूर ,
सुनिता सोनवने, स्मीता पोतदार, मीरा सुरवसे ,साजिदा शेख ,इरप्पा मंडले ,बबन लिंबाळे, बाळासाहेब कवठे, सुरज घोरपडे, धिरज हिप्परगे, रुपचंद राठोड यांनी परिश्रम घेतले.