उस्मानाबाद,  दि.०४        

संपूर्ण घरपट्टी भरल्यास ग्रामस्थाना मोफत दळण व चटणी कांडप हा अनोखा उपक्रम जो रुईभर  ग्रामपंचायतने सुरू केला असून त्यामुळे गावच्या विकासात निश्‍चितपणे भर पडेल ,घरपट्टी भरल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीत वाढ होईल.  असे उदगार माजी सरपंच तथा डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष  कोळगे यांनी काढले.  


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन रविवारी दि 1 रोजी रुईभर येथे मोफत दळण  व चटणी कांडपचे उद्घाटन सुभाष कोळगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  यावेळी  ते बोलताना पुढे  म्हणाले की, ग्रामस्थांनी या उपक्रमाचा पुरेपूर फायदा घ्यावा व उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोफत दळण व चटणी कांडपचा उपक्रम गावातील घरा- घरात पोहंचवुन गावकऱ्यांना घरपट्टी भरून ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी शेवटी सांगितले.

 .यावेळी  माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, माजी उपसरपंच राजाराम कोळगे, सरपंच बालाजी कोळगे, प्रगतशील शेतकरी गणपत माने, जयप्रकाश , आगतराव भोयटे , किसन निंबाळकर, धनंजय चव्हाण, शंकर चव्हाण, दिलदार खोंदे, किशोर सिरसाठे, ग्रामसेवक कुंभार, सोसायटीचे सचिव नानासाहेब कदम, मुकुंद लोमटे, डॉ मानकोळी नितीन, माळी संतोष वडवले, दादा लोमटे बळीराम मते, गणपत कस्पटे, राजेंद्र गव्हाणे, अर्जुन कोळगे, महादेव गव्हाणे, चंद्रसेन वडवले, अमोल कलाल, शिवाजी कोळगे, राम नलवडे, नरहरी शिंपले, पांडुरंग गुरव, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


 प्रारंभी  मान्यवरांच्या हस्ते मोफत गिरणी व चटणी कांडपचे उद्घाटन करण्यात आले. जे गावकरी पूर्ण वर्षाची घरपट्टी भरतील त्यांना मोफत दळण व चटणी कांडून मिळणार अशा प्रकारचा अनोखा  उपक्रम सुरू केल्यामुळे रुईभर व परिसरात ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे. 
 
Top