काटी ,दि . १४ :उमाजी गायकवाड
नवी मुंबईतील डॉ. आर.एन. पाटील संचलित सानपाडा मुंबई येथील योग्य दरात रुग्णांना दर्जेदार सुविधा देणाऱ्या सुरज हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. आर.एन.पाटील व डॉ. अंजली पाटील या दाम्पत्याला 2022 च्या लोकमत वेलनेस मेनटर्स आॕवार्ड ने प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे संचालक सुधाकर शिंदे, जे.जे. हॉस्पिटलचे डॉ.कल्याण मुंढे, डॉ. ॠषीकेश पायी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दि.12 रोजी लिला अंधेरी येथे सायंकाळी 5:30 वाजता राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. आर. एन. पाटील हे काटी येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी सरपंच ॲड.भैरीनाथ साळुंके यांचे जावई आहेत तर उद्योजक अनिल साळुंके यांचे मेव्हणे होत. डॉ.पाटील यांचे सानपाडा मुंबई येथील सुरज हॉस्पिटल मेंदू, मणका, आणि हृदय विकारावर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रदीर्घ वैद्यकीय सेवेचा फायदा सर्वसामान्य जनतेला व्हावा हा एकमेव दृष्टिकोन ठेवून डॉ. आर.एन.पाटील व डॉ. अंजली पाटील यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा आहे.
डॉ.आर.एन. पाटील व डॉ.अंजली पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वञ आभिनंदन होत आहे.