नळदुर्ग,दि.१३:  एस.के.गायकवाड

 वाचन हे सकस मनाचा आहार आहे. त्यामुळे माणसाची बौद्धिक प्रगती होते आणि सामाजिक जाणिवा प्रगल्भ होतात यासाठी "ओळख थोरांची "हे पुस्तक समाजातील सर्वच घटकांसाठी उपयुक्त असून विविध उपक्रमातून ज्ञानकिरण संस्थेने केलेले कार्य हे स्तुत्य असल्याचे मत माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

 ज्ञानकिरण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य गौरव, कोरोना योद्धा, शिक्षक , क्रिडा व युवा उद्योजक आणि समाज गौरव पुरस्काचे वितरण व भैरवनाथ कानडे लिखित "ओळख थोरांची " पुस्तक प्रकाशन समारंभ  नळदुर्ग येथे दि . ( ११ ) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी मंञी मधुकरराव चव्हाण हे बोलत होते. . 


नळदुर्ग येथील एस.के. फंक्शन हॉलमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे - पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, प्रमुख वक्ते म्हणून सोलापूरच्या माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नसीमा पठाण , नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सपोनि सिद्धेश्वर गोरे , मराठवाडा साहित्य परिषदेचे  नितीन तावडे इचलकरंजीचे वस्त्र उद्योजक जतनसिंह मेहता ,ज्येष्ठ साहित्यिक माधव गरड ,सुप्रिया परळकर, ज्ञानकिरण संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, सचिव चंद्रकांत कांबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी शब्दवेध प्रकाशन औरंगाबाद प्रकाशित भैरवनाथ कानडे लिखित "ओळख थोरांची " या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .  यावेळी डॉ. सई भोरे पाटील व सपोनि सिद्धेश्वर गोरे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.अर्जुन पुरस्कार प्राप्त तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांना महाराष्ट्र क्रीडा भूषण पुरस्कार तर  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे स. कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे ( सोलापूर ) सौ .अर्चना पानारी (कोल्हापूर ) ,प्रेमचंद अहिरराव (धुळे ), माधव सुभानराव  गरड (उस्मानाबाद, ) शशिकांत जाधव (सोलापूर ) , जयश्री वाघ (नाशिक)  किरण भावसार (नाशिक )डॉ.मच्छिंद्र नागरे (करमाळा ) डॉ . संजय गायकवाड ( औरंगाबाद ) यांना साहित्य गौरव तर संदीप पाटील (अंबरनाथ ) बाळू नेहे ( ठाणे ) अरुण अंगुले ( नळदुर्ग ) विक्रम पाचंगे ( उमरगा ) अनिता माने (उमरगा ) यांना महाराष्ट्र शिक्षक भूषण पुरस्कार तर महाराष्ट्र कोरोनायोद्धा पुरस्कार विजय  जाधव (उमरगा ) , तर बालाजी अंबादास नायकल , (उस्मानाबाद )व जतनसिंह मेहता ( इचलकरंजी ) यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार ,  महाराष्ट्र युवा व उद्योजक पुरस्कार सचिन धरणे ( नळदुर्ग ) महाराष्ट्र युवा कार्यकर्ता गौरव पुरस्काराने अॅड.रामचंद्र ढवळे ( तुळजापूर ) यांना सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी संस्थेच्या वतीने  गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करून विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ करण्यात आला.


  महापुरुषांच्या चरित्रात्मक पुस्तकातून आपले जगणे सुंदर व प्रतिष्ठित होते आणि मानव धर्माची शिकवण मिळते असे विचार डॉ.नसीमाताई पठाण यांनी मांडले. 


याप्रसंगी  मारुती बनसोडे, माधव गरड आदींची भाषणे झाली.या कार्यक्रमास यशवंत गायकवाड , रानबा  जाधवर, लक्ष्मण गायकवाड,  विकास गायकवाड, समीर सुरवसे, डॉ. एम. बी. बिराजदार, शिवाजी मिटकर, परमेश्वर धरणे, कल्पना गायकवाड, शरणप्पा कबाडे,पांडुरंग पुदाले ,संदीप सुरवसे, राजेंद्र गरड , गंगाधर सर्जे, डॉ . आनंद काटकर , अजहर जहागिरदार,शिवाप्पा जवळगे , डॉ. पी .एस .गायकवाड, अरुण लोखंडे ,एस. के .गायकवाड , पांडूरंग पवार, सत्यवान गायकवाड , तानाजी म्हेत्रे , संजय मोटे, धोंडिराम कदम,  दादासाहेब बनसोडे, लतीफ शेख,सचिन गायकवाड,सुनिल बनसोडे, उमेश गायकवाड, अमोल पाटील, शिवाजी माने , शिवानंद खुणे महावीर धोंगडे, कवयित्री कविता पुदाले, दुर्वास बनसोडे,  
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले. तर सूत्रसंचालन भाग्यश्री देवकते यांनी व डॉ. एम.बी .बिराजदार यांनी आभार मानले.


 

चिकुंद्रा ग्रामस्थांच्या वतीने व नळदुर्ग येथील ऋणानुबंध आणि सखीमंचच्या  वतीने  ओळख थोरांची या पुस्तकाचे लेखक सहशिक्षक भैरवनाथ . कानडे यांचा सत्कार करण्यात आला

 
Top