तुळजापूर , दि . १४
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर मराठी साम्राज्याची पताका समर्थपणे फडकत ठेवणारे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याला आणि कर्तृत्वाला जयंतीदिनी आभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम , अरुण कदम प्रकाश कदम ,महादेव सोनवणे, तानाजी डावरे, गोपाळ सोनवणे, संजय कदम, दशरथ सावंतसह कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संघटक व प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे, शहराध्यक्ष अमर चोपदार , युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, युवा नेते महेश चोपदार, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, रोहित चव्हाण, गोविंद देवकर ,गणेश ननवरे, कार्याध्यक्ष शरद जगदाळे ,मकसूद शेख, बालाजी कांबळे आदीनी अभिवादन केले.