वागदरी ,दि. १४ :
तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या वतीने राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर विधान सभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, रिपाइंचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,रिपाइंचे तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राजे छत्रपती संभाजी महाराज याना त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांना आभिवादन करण्यात आले.
यावेळी तानाजी डावरे, महादेव सोनवने,संजय कदम,पिंटू पांडागळे, दशरद सावंत, अमर चोपदार, बबन गावडे, संदीप गंगणे,तानाजी हावळ,ज्ञानदेव कदम,गोपाळ सोनवनेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .