जळकोट,दि.१४


येथून जवळच असलेल्या नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


तेरणा जनसेवा केंद्र, उस्मानाबाद व तेरणा  स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,नेरुळ , मुंबई यांच्यावतीने नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवार (दि.१७)रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान ,नाक व घसा, अस्थीरोग व पोटाचे विकार यावर नामवंत डॉक्टरकडून आरोग्य तपासणी होऊन त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. सकाळी ९.३०वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा नांदगाव व परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन वैभव पाटील मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top