नळदुर्ग , दि . १८
नळदुर्ग येथील बौध्दनगरमध्ये शांतीचा,समतेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांची २५६६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी परिवर्तनचे मारुती बनसोडे यांच्या हस्ते भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांंचे पुजन करून डी.बी.एन.सामाजिक संघटनेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी पप्पू कांबळे, अजय कांबळे ,संभाजी कांबळे , उत्तम बनसोडे , माणिक राठोड , आप्पाराव बनसोडे , अरुण भांगे , आकाश कांबळे , शाहीर कांबळे ,गौतम बनसोडे अनिल भांगे ,दिलीप भांगे ,शिरमल बनसोडे ,अजय राठोड ,विजय राठोड , आदर्श कांबळे, संबुध्द गायकवाड , नागनाथ कांबळे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.