वागदरी, दि . १८
विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ जयंती निमित्त मौजे वागदरी ता.तुळजापूर येते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी व पंचशील बुद्ध विहार कमिटी वागदरी यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने दि.१६ मे २०२२ रोजी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उत्तम झेंडारे, सचिव संदिपान वाघमारे ,जेष्ठ कार्यकर्ते मोहन वाघमारे,उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे,अनिल वाघमारे आदींच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांंचे पूजन करून पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. तर सायंकाळी ठिक ७.३० वा.दरम्यान व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे म्हणाले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी राजग्रहाचा त्याग करून खडतर तपश्चर्या करून समता स्वातंत्र्य बंधूता आणि न्याय या तत्त्वावर स्थापन केलेला बौद्ध धम्म म्हणजे संबंध मानवजातीच्या कल्याणाचा राजमार्ग होय.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंती उत्सव कमिटीचे सचिव संदिपान वाघमारे यांनी केले.
या वेळी डी.बी.एन.सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, सादु वाघमारे, शिवाजी वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, हणमंत वाघमारे, कल्लाप्पा वाघमारे, अंबादास झेंडारे,प्रकाश वाघमारे, सुर्यकांत वाघमारे,भारत वाघमारे, उज्वला वाघमारे, कविता गायकवाड,ठकुबाई वाघमारे, गीताबाई झेंडारे सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.