नळदुर्ग ,दि. ०४
शासनाच्या विमुक्त भटक्या जाती जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष शांताराम मोरे यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
सदर कमिटीचा दोन दिवसीय लातूर दौरा होता.त्याच्यासमवेत विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड उपस्थित होते.अध्यक्ष व कमिटी सदस्य यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केला.
यावेळी अमर खानापुरे, बाबासाहेब गोसावी,कक्ष अधिकारी विनोद राठोड,सागर कावरे, किशोर गंगणे, चिन्मय मगर,शिवाजी चव्हाण, सुभाष नाईक उपस्थित होते.