नळदुर्ग ,दि. ०३
नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी "आपलं घर" प्रकल्पातील अनाथ विद्यार्थ्यासमवेत शालेय साहित्य व खाऊ वाटप करून केला उत्साहात वाढदिवस साजरा
वाढदिवस म्हटले की पार्टी,फटक्याची आतिषबाजी वगैरे डामडौल आलेच. माञ आनावश्यक खर्चाला फाटा देऊन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी आलियाबाद येथिल "आपलं घर" प्रकल्पातील अनाथ विद्यार्थ्याबरोबर त्यानी वाढदिवस साजरा केला .
प्रारंभी जेष्ठ समाजवादी विचारवंत , राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ नेते पन्नालालभाऊ सुराणा यांच्या हस्ते सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून पेढा भरून सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी आपलं घरची इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी काजल पवार यांचा ही तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स.पो.नी.गोरे यांच्या हस्ते सत्कार करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी परिवर्तनचे मारूती बनसोडे, रिपाइंचे जिल्हा सचिवा एस.के.गायकवाड, पत्रकार दयानंद काळुंके,आनंत काटकर, पत्रकार किशोर धुमाळ आदीसह विद्यार्थी, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले तर अभार आपलं घरचे व्यवस्थापक विलास वकील यांनी केले.