तुळजापूर ,दि . ०३
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बहूचर्चित असणारी औरंगाबाद येथील ८ जुन रोजीची नियोजित सभा निर्विघ्नपणे आणि यशस्वी पार पडू दे यासाठी माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज शुक्रवार दि.3३ जुन रोजी तुळजापूर येथे येऊन आई श्री तुळजाभवानी मातेला साकडे घातले.
महाराष्ट्र राज्यातील बळीराजा सुखात राहिला पाहिजे,यंदा पाऊसपाणी मुबलक पडावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात बळीराजाला चिंतामुक्त करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत, महाराष्ट्र राज्य देशात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद असावा यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी प्रार्थना केली.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे,माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार,शहर प्रमुख सुधीर कदम,उपशहर बापूसाहेब नाईकवाडी,उपतालुका प्रमुख सुनील जाधव, सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर,विभाग प्रमुख महादेव पवार,विभाग प्रमुख बालाजी पांचाळ,धुळाप्पा रक्षे,युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे,सुनील खडके, बबन पताडे, संजय सूर्यवंशी, धनंजय शिंदे आदींची उपस्थित होती.