तुळजापूर, दि. ३ 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण झालेले डिजिटल अक्षर ओळख कॅलेंडर लहान विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त आहे यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास निश्चित होईल असे उद्गार मुख्याध्यापक आर. आय. औसेकर यांनी काढले.


नळदुर्ग येथील वसंतनगर परिसरात असणाऱ्या तीन अंगणवाडी वर्गांना महा एनजीओ फेडरेशन आणि संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा तूळ, आमदार संवाद मंच तुळजापूर यांच्या वतीने श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिजिटल अक्षर ओळख कॅलेंडर भेट देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. आय. औसेकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका छमाबाई राठोड, आरपीआयचे मराठवाडा सदस्य दुर्वास बनसोडे, महा एनजीओ फेडरेशनचे राज्य समन्वयक तानाजी जाधव, आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी, संगणक तज्ञ सनी बनसोडे, अंगणवाडी कार्यकर्ती आशा लक्ष्मण गायकवाड सुनिता जाधव, वैजयंती लोंढे, सौ रैना बागल, सौ. वाघमारे आणि अंगणवाडीतील विद्यार्थी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत आशा गायकवाड, वैजयंती लोंढे व सुनिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन शैक्षणिक उपकरणे लहान विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त आहेत. याच्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती प्रबळ होते आणि विद्यार्थ्यांचा भौतिक विकास होतो. त्यामुळे महा एनजीओ फेडरेशनने दिलेले डिजिटल कॅलेंडर निश्चितपणे विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे, असे मुख्याध्यापक आर.आय.औसेकर यांनी सांगितले. 


राज्य समन्वयक तानाजी जाधव यांनी महा एनजीओ फेडरेशनकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची याप्रसंगी माहिती दिली. रिपाईचे मराठवाडा सदस्य दुर्वास बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी कार्यकर्ती सौ.आशा गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी  वसंतनगर परिसरातील महिला पालक  कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
 
Top