तुळजापूर, दि. २ :


तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे दि. २७ शुक्रवार पासुन विठ्ठल-रूक्मीणी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या महोत्सवाला सुरूवात झालीआहे.


बारूळ येथे  सकाळी ग्रामस्वच्छतेत गावातील गटारी व रस्त्यावरील कचरा उचलुन,विठ्ठल-रूक्मीणी मंदिर परीसर,श्री बाळेश्वर मंदिर परिसर,तसेच जिल्हापरिषद शाळा,बाळेश्वर विद्यालय,व आरोग्य केंद्र परीसरातील गटारी, कचरा उचलुन स्वच्छता मोहीम यशस्वी पणे राबविण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत बारूळ चे सुपुत्र पण सध्या कतार देशात कार्यरत असणारे मनोज जयप्रकाश पाटील,समाजसेवक नबीलालचाचा शेख,माजी सरपंच शहाजी सुपनार, प्रा.सुरेश ठोंबरे ,बारूळचे ग्रामसेवक प्रशांत भोसले, रोहीत पाटील, भास्कर सगट  ,राजेश लोखंडे,धनराज धनवडे सर,पाडुरंग लोखंडे, अँड.पवन वट्टे, बालाजी भालेकर,राम तुळजापूरे,खंडु क्षिरसागर,अनील यावलकर, कमलाकर ठोंबरे,अनील लोखंडे,ओमकार वट्टे,लिबंराज धनवडे,सुनील धनवडे,सदाशिव लोखंडे, आनंद ठोंबरे,तुषार पवन वट्टे, आबा गोरे,सादु क्षिरसागर,प्रथमेश तुळजापूरे व पत्रकार सोमनाथ शेटे आदींनी ग्रामस्वच्छता केली.


अखंड हरीनाम सप्ताहात किर्तनकार मोहन पाटील महाराज किलज,ह.भ.प.महेश महाराज माकणी,हभप.दत्तात्रेय फुलारी महाराज लातूर,हभप.सुधाकर इगंळे महाराज सोलापूर,हभप.अँड पाडुरंग लोमटे महाराज उस्मानाबाद,हभप.नीतीन महाराज कवळी हिप्परगा,हभप.राजेंद्र शास्री महाराज पाटोदा जि.बीड,व काल्याचे किर्तन हभप.गुरूवर्य आबासाहेब भोसेकर महाराज पंढरपूर ई.किर्तने झाली.दि.३ जुन शुक्रवारी या अखंड सप्ताहाची सांगता महाप्रसादाने,व काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
 
Top