नळदुर्ग , दि . ०८

 महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी   स्वतःमधील कलागुणांना वाव देऊन व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याची गरज आसल्याचे मत असे  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले.


तुळजापूर तालुक्यातील  आलियाबाद ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रकाश चव्हाण हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच सौ ज्योतीका चव्हाण या होत्या.


शासन महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्याचा फायदा ग्रामीण उद्योजकांनी घेतला पाहिजे आणि अपेक्षित असलेला बदल करून स्वतःचा व्यवसाय वाढवला पाहिजे असे  प्रबोधिनीचे राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी  सांगितले .
 यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास राठोड , पोलीस पाटील शिवाजी चव्हाण,माजी सरपंच सुभाष नाईक, भील्लू राठोड, विश्वास चव्हाण, मनोज पवार,   हॅलो मेडिकलच्या  रिना चव्हाण, बचत गटाच्या सुरेखा चव्हाण, निर्मला राठोड, जयश्री चव्हाण,शांताबाई चव्हाण, रंजना राठोड, सुनीता चव्हाण, रेश्मा चव्हाण,चावळाबाई राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील महिला मुली व बचत गटातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
 
Top