तुळजापूर,दि.९
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक,संस्थापक आणि महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले ज्ञानतपस्वी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी मेजर डॉ.डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ डोके यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी स्वत:च्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही, त्यांच्या विचारांवर महात्मा गांधींच्या व्यक्तीत्वाचा प्रभाव दिसून येतो,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नावाचे वटवृक्ष हे त्यागाच्या बिजातुन निर्माण झालेले आहे.
बापूजींनी बहुजन आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानगंगेचे अमृत दिले,जात ,धर्म,पंथ कधीही त्यांच्या विचारांमध्ये डोकावत नाही, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही ते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहुन या समाजासाठी स्वत:ला समर्पित करतात, भविष्यात असे अनमोल व्यक्तीत्व पुनः होणे नाही, आणि म्हणुनच आज प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे मत शेवटी डॉ डोके यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी प्रा जे बी क्षीरसागर यांनी ही उपस्थितांना बापूजीच्या जीवन व कार्य विषयक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाप्रसंगी डॉ.
एस. एम.देशमुख,रासेयो प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.ए.बी.वसेकर, गोवर्धन भोंडे,प्रा.जी.व्ही बाविस्कर, डॉ.सी आर दापके, डॉ.एफ.एम तांबोळी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ एम.आर.आडे यांनी केले तर आभार प्रा अशपाक आतार यांनी मानले,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपन्न झाला.