नळदुर्ग ,दि. २९ :
लातूर समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री.अविनाश देवसटवार यांनी मंगरूळ येथील वात्सल्य सामाजिक संस्थेस भेट देऊन संस्थेमार्फत चाललेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले.
श्री.देवसटवार हे त्यांच्या लातूर, उस्मानाबाद , नांदेड,हिंगोली या विभागात येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये वृक्ष लागवडी विषयी सातत्याने कार्यरत आहेत. वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या अत्यंत दुर्मिळ वनौषधी,देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड त्याचे केलेले उत्तम संगोपन,समाजामध्ये चाललेल्या वृक्ष चळवळीच्या जागृतीची माहिती घेतली.
प्रारंभी त्यांचे संस्थेमार्फत तुळशीची माळ घालून व पर्यावरणपूरक बुके देऊन औक्षण करण्यात आले. श्री.देवसटवार म्हनाले की,संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका, गोशाळा,वृक्ष चळवळ, एकल महिलांसाठी चाललेले काम, हे सर्व समाजोपयोगी उपक्रम पाहून समाधान वाटले.संस्थेच्या कामास माझ्या शुभेच्छा असून भविष्यातील सर्व उपक्रमात मला सहभागी व्हायला आवडेल.
यावेळी त्यांच्या समवेत लातूर जिल्हा सहाय्यक समाजकल्याण आयुक्त श्री शिवकांत चिकुर्ते,श्री.सचिन नटवे उपस्थित होते.