काटी ,दि . ०८
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलास पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी गुरूवारी सदिच्छा भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी भटक्या विमुक्त समाजातील बालकांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम यमगरवाडी शाळेने केल्याचे सांगून सर्व समाजातील विद्यार्थी यमगरवाडी विद्या संकूलात शिक्षण घेत असल्याचे पाहून त्यांनी प्रकल्पाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांना येणारे चढउतार याविषयी माहिती देऊन बालहक्क शिक्षण कायद्याविषयी मुलांना मोफत आणि सक्तीचे अनिवार्य शिक्षण कायदा,2009 मधील अधिकार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करणे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक मंजुळे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे,अण्णासाहेब मगर,महादेव शेंडगे,अशोक बनकर,अनिल घुगे,बालाजी क्षीरसागर,संतोष बनसोडे,दयानंद भडंगे,हरीश मगदूम,किरण चव्हाण,प्रणिता शेटकार,निर्मला हुग्गे,सविता गोरे,कोंडीबा देवकर,खंडू काळे,दत्ता भोजने ,भीम कुंभार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अण्णासाहेब मगर तर आभार बालाजी क्षीरसागर यांनी मानले.