नळदुर्ग , दि. २९ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले , राज्य संपर्क अधिकारी एन एस एस डॉ.प्रशांतकुमार वनंजे , डॉ. शरद बोरुडे अहमदनगर एन एस एस संचालक डॉ. आनंद देशमुख यांच्या हस्ते औरंगाबाद येथे नुकतेच प्रदान करण्यात आला. यापूर्वी विक्रम राठोड यास 2020-21 चा महाराष्ट्र शासनाचा उस्मानाबाद जिल्ह्याचा कोविड योद्धा पुरस्कार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंञी मधुकरराव चव्हाण , सचिव उल्हास बोरगावकर , प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य डाॅ.ढोकळे ,डाॅ.झाडे , नॅक समन्वयक, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश शेरे, डॉ.रोहिणी महिंद्रकर, प्रा. महेंद्र भालेराव यांनी त्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.