नळदुर्ग, दि . १६
दुर्लक्षित झालेल्या नळदुर्गचा ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा युनिटी कंपनीने रुपडे पालटुन पर्यटन क्षेञात क्रांती घडून नळदुर्गचे नाव जगाच्या कानाकोप-यात नावलौकिक केले आहे. युनिटी कंपनीचे हे उल्लेखनीय व कौतुकास्पद उपक्रम प्रेरणादायी असल्याचे गौरव उदगार नायब तहसिलदार चद्रंकांत शिंदे यानी काढले.
स्वतंत्र लढ्यात योगदान दिलेल्या स्वतंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आणि देशसेवा केलेल्या माजी सैनिक व त्यांच्या पश्चात
कुटूंबातील सदस्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन नळदुर्ग येथिल भुईकोट किल्ला शासनाकडुन जतन व संगोपनार्थ घेतलेल्या युनिटी मल्टीकॉन्स कंपनी सोलापूरच्या वतीने सोमवार दि. १५ आॕगस्ट रोजी सन्मान करण्यात आला.यावेळी नायब तहसिलदार चद्रकांत शिदे हे बोलत होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरानी युनिटी कंपनीच्या स्तुत्य उपक्रमाबात कौतुकाचा वर्षाव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर, प्रमुख अतिथी नायब तहसिलदार चद्रंकांत शिदे , युनिटी कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी जिल्हा बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक शिवाजी मोरे, माजी नगरसेवक शहबाज काझी, मुस्ताक कुरेशी, शफी शेख , बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण,इमाम शेख , भाजप शहराध्यक्ष भिमाजी घूगे, माजी शराध्यक्ष पद्माकर घोडके , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मेहबूब शेख, अजित जुनोदी ,दमयंती महिला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुभद्रा मुळे, शहर काँग्रेस महिला अध्यक्षा कल्पना गायकवाड, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, मनसे शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर, श्रीमाक पोतदार , शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर, नेताजी महाबोले , बंडू पुदाले , सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक , तानाजी जाधव , दादासाहेब बनसोडे , उत्तम बणजगोळे , लतीफ शेख , आयुब शेख , अनिल जाधवर , प्रा.दिपक जगदाळे , अजित चव्हाण, आदिच्या हास्ते शाल , किल्ल्याची प्रतिमा , मिठाई देवुन मान्यवारांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी उपस्थिताचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी कफिल मौलवी यांचा सत्कार शहबाज काझी यानी केले. शेवटी अध्यक्षीय समारोप माजी नगरसेवक भास्करराव मोहरीर यानी केले.
यांचा झाला सन्मान
वीर पत्नी लक्षमीबाई गायकवाड , हुतात्मा पुञ बाबुराव स्वामी , स्वातंत्र्य कोरे परिवाराचे दत्ताञ्य कोरे , विजयकुमार यादगिरे , दुर्वास बनसोडे , विनायक भुमकर , वसंत रामदासी , किरण पाटील , सुधीर सुरवसे ,आबा जाधव , विनय पंडित , शिवाजी माने , प्रकाश रंगबले , शिवरंग हत्ते , दोमोदर सोमवंशी , विश्वनाथ हात्ते , विठ्ठल जाधव , प्रकाश मोरडे , सिद्राम मुळे , शिवानंद खद्दे , बाळु माने , भिकाजी सुरवसे , केशव गोदे, जहिरोद्दीन शेख , नरसु दस , वसंत घोडके , उषा पुजारी दुरुगकर , विश्वभंर सुरवसे , निलय्या स्वामी , दशरथ जाधव , भारत जाधव , शिवाजी जाधव आदिसह इतराचाही सन्मान करण्यात आला.
सुञसंचलन व आभार युनिटीचे जनसंपर्क आधिकारी विनायक अहंकारी यानी मानले. कार्यक्रमासाठी युनिटीचे किल्ला व्यवस्थापक जुबेर काझी , अमिर फुलारी , समीर काझी यानी पुढाकार घेतले.
युनिटी मल्टिकाँन्स कंपनीचे मुख्य संचालक कफिल मौलवी
स्वातंत्र्यासाठी बलिदान , योगदान देणा-यांचा
स्वतंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्तने स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा सन्मान करताना मनस्वी आभिमान वाटतो. त्यांच्या प्रति अदर व्यक्त करण्यासाठी म्हणुन स्वतंत्र्य सैनिक , माजी सैनिकांना व त्यांच्या कुटूंबियाना नळदुर्ग किल्ल्यात मोफत प्रवेश युनिटीचे मुख्य संचालक कफिल मौलवी यानी यावेळी जाहिर केले.