तुळजापूर , दि. १६
पुणे येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत तुळजापूरच्या मुलांनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदक पटकावले. यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे.
राजमुद्रा मार्शल अँड स्पोर्ट असोसिएन पुणे यांचा वतीने आयोजित ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२२ मध्ये शहरातील न्यू कराटे - डू असोसिएनच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत शहरातील श्रेयस भागवत, गणेश पवार, गायकवाड व प्रथमेश चौधरी या
चार मुलांनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये श्रेयस भागवत आणि गणेश पवार यांनी सुवर्ण पदक तर गायकवाड व प्रथमेश चौधरी यांनी रौप्य पदक पटकावले. या स्पर्धकांना सुधाकर उळेकर व ज्ञानेश्वर गाडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडू वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.