तुळजापूर ,दि. १६

भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त तुळजापूर शहरातून 1100 फूट तिरंगा रँली काढण्यात आली.


तुळजापूर शहरातील शिंदे प्रशाला येथून रॅली सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,भवानी रोड, महाद्वार,आर्य चौक,कमानवेस, मंगळवार पेठ ,मार्गे काढण्यात आली. या रॅलीसाठी नवोदय विद्यालय, श्री तुळजाभवानी महाविद्यालय, कुलस्वामिनी विद्यालय, सैनिक विद्यालय ,शिंदे प्रशाला ,यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, या रॅलीत नगराध्यक्ष सचिन रोचकरी ,नागेश नाईक ,बापू कणे ,किशोर साठे ,विजय कंदले, गुलचंद व्यवहारे, अभिजीत कदम,मिना सोमाजी,अँड.थिटे  ,अँड. साबळे , अँड. नळेगावकर  ,अलोक शिंदे  ,शहाजी भांजी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले ,शहराध्यक्ष राजेश्वर कदम, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, सरचिटणीस सागर पारडे, उपाध्यक्ष राम चोपदार, निलेश नाईकवाडी, ऋषिकेश साळुंके,गौरव जेवळीकर, ऋतुपर्ण कांबळे, आकाश धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top