नळदुर्ग , दि.२० :सुहास येडगे

 नळदुर्ग शहरांतील व्यासनगर येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी नवीन मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार असुन या कार्यक्रमास महादेव भक्त व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महादेव भक्त  तानाजीराव भाळे यांनी केले आहे.
     

  शहरांतील व्यासनगर येथे राष्ट्रीय महामार्गालगत अनेक वर्षांपासुन श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे. हा महादेव नवसाला पावणारा असल्याने संपुर्ण श्रावण महिना व दर सोमवारी या मंदिरात श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. मंदिराराची थोडी पडझड झाली होती. तसेच मंदिरातील शिवलिंगही भंग पावले होते. त्यामुळे जुने मंदिर काढुन त्याठिकाणी स्वखर्चाने  जवळपास ५ लाख रुपये खर्चून महादेव भक्त  तानाजीराव भाळे यांनी अतीशय भव्य आणि सुंदर असे महादेव मंदिर उभारले आहे. या मंदिराचे बांधकाम नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर मठाचे श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
        या नवीन मंदिरात दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी११.२० वा.नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर मठाचे श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराज व अणदुर  ता.तुळजापूर येथील निलकंठेश्वर मठाचे श्री ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते नवीन मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 


दि.२० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. नविन मुर्तीची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.सायंकाळी ६ ते ७ जलाधिवास,७ ते ८ धान्यधिवास ८ ते ९ शयनाधिवास हे कार्यक्रम होणार आहेत. दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ११ स्वस्ती पुण्यावाचन,नांदी समाराधना, अंकुर्णपण,जगद्गुरू पंचाचार्य प्रतिष्ठापना, कात्ययनी प्रतिष्ठापना, नवग्रह प्रतिष्ठापना, अग्निप्रतिष्ठापणा व नविन मुर्ती मंत्रसंस्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. मुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
         
या कार्यक्रमास उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव भक्त  तानाजीराव भाळे यांनी केले आहे.
 
Top