वागदरी, दि. २७: एस.के.गायकवाड:

 शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैल जोडीचा आणि त्यांच्या श्रमाचा सन्मान करणारा सण म्हणजे बैलपोळा सण होय.हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून नळदुर्ग, वागदरी व परिसरात (ता.तुळजापूर ) मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमांने बैल पोळा हा सण साजरा करण्यात आला.
  

 शुक्रवार दि.२६ आँगस्ट  रोजी पहाटे ५ वाजल्यापासूनच बैलपोळा सणानिमित्त शेतकरी वर्गात हालचाल सुरू झाली.आपल्या गोट्यातील पशूधन बैल जोडीसह चारायला सोडून चारा, पाणी व्यवस्थित करून अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान झाल्याची खंत थोडा वेळ विसरून नदी, नाल्याच्या पाण्याच्या डोहात  बैलजोडीस पोहणी घालून साबण व शांम्पूने बैलांचे व इतर पशूधनास आंघोळ घलून बैलांच्या अंगाला पीवळीमाती लावून त्यांना कंडेदोरे,मोरक्या,शिंगे रंगवून शिंगाला बेगड व रंगीबेरंगी  गोंडे बांधून त्यांना शेतक-यानी सजविले. 
  

बैलजोडीचे मेकअप झाल्यावर त्यांची  पूजा करून बैलजोडीची वाजतगाजत बसवेश्वर महाराज की जय, आसा जयघोष करत गावातील मुख्य रस्त्यावरुन चौकातील हनुमान मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली . 
येथील जाधव बंधू शेतकऱ्यानी तर चक्क बँजो लावून आपल्या बैलजोडीची मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बैलजोडीने ही आपला होत आसलेल्या सन्मानाला दाद देत दिमाखात मिरवणुकीत चालत होते. मध्येच लाकडाच्या चौकोनी ओंडक्यवर चारी पाय ठेवून उभेराहून मिरवणूकीत सहभागी जनतेला नमस्कार करून सर्वांची मने जिंकली. एकंदरीत बैल पोळा हा सण नळदुर्ग,वागदरी व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 
Top