किलज ,दि. १६ :

 किलज ता.तुळजापूर  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका रेखा नारायणकर यांचा स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने त्यांच्या शालेय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबदल सरपंच अर्चना शिंदे व उपसरपंच दिक्षा गवळी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


गेल्या ४ ते ५ वर्षांपासून सहशिक्षिका नारायणकर या किलज जिल्हा परिषद  शाळेत सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात.विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न असायला हवा, याकरिता सहशिक्षिका या शाळेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा , स्पर्धा  परीक्षासाठी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायतीने  त्यांचा शाल,पुष्पगुच्छ, देऊन  सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत परिसरात विविध मान्यवर  उपस्थित होते.
 
Top