नळदुर्ग, दि .१६
अखेर नळदुर्ग शहरात विविध महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आले असुन त्यांचे नियंञण कक्ष पोलिस ठाण्यात आहे. स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून सोमवार दि. १५ आॕगस्ट रोजी सीसीटिव्हिचे लोकपर्ण मान्यवराच्या हास्ते करण्यात आले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार नगर परिषद मार्फत नळदुर्ग शहरात बालाघाट काँलेज , बसस्थानक , महामार्गावर , अक्कलकोट रस्त्यावर , शहरात जाणा-या मुख्य रस्त्यावर , शाञीचौक , भवानी चौक , चावडी चौक, क्रांती चौक , किल्ला गेट , आदिसह विविध ठिकाणी 30 सी सी टी व्ही सुरू करण्यात आले आहे. त्याचे नियंत्रण कक्ष पोलीस ठाण्यात आहे. नायब तहसीलदार चद्रकांत शिंदे , मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सुधीर मोटे, यांच्या हस्ते फित कापुन व श्रीफळ वाढुन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक एम.एम.शाहा, जिविशाचे धनाजी वाघमारे, न. प. कार्यालयीन अधिक्षक अजय काकडे, नगर अभियंता वैभव चिंचोळे, लेखापाल गोविंद अंबर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड, अभियंता स्वप्नील काळे, विनित चव्हाण, अबू काझी, सुशांत भालेराव, सुशांत डुकरे, नवनाथ होणराव, किशोर बनसोडे, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, दादासाहेब बनसोडे, आयुब शेख, अजित चव्हाण, शोएब काझी आदि उपस्थित होते.