चिवरी , दि. १६ : राजगुरूसाखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील अंगणवाडी शाळेमध्ये दि, १६ रोजी गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरी मुलींना मार्गदर्शनपर मेळावा संपन्न झाला, हा मेळावा पर्यवेक्षिका पुष्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी देशमुख यांनी महिलांना योग्य आहार ,आरोग्य, स्वच्छता यावर मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, लक्ष्मी मेंढापुरे,उषा सुरवसे, मदतनीस कल्पना शिंदे, रेशमा चिमणे, हिरकणाबाई लोहार, आशा कार्यकर्त्या राजश्री कांबळे, अर्चना राजमाने, ग्रामपंचायत सदस्य पार्वती भुजबळ, कृषीमिञ कुमोदिनी मुळे आदीसह किशोरवयीन मुली, महिला उपस्थित होत्या.