नळदुर्ग, दि.१९ :
येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.२२ ते २६ आॕगस्ट रोजी नळदुर्ग येथिल लोकमान्य वाचनालय याठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त दि.२२ रोजी सांयकाळी ५ वाजता उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार , पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे , वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या
हास्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी व माजी सैनिक,निवृत्त कर्मचारी यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर नळदुर्ग , मानेवाडी , वागदरी , चिकुंद्रा येथिल भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम , संत निरंकारी सत्संग कार्यक्रम , दि.२३ रोजी श्रीमती महाबोले भारतबाई यांच्या हास्ते प्रतिमेचे पुजन , दुपारी १२ वाजताह.भा.प. कमलाकर मुळे महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप सुरवसे, उपाध्यक्ष नेताजी महाबोले , सचिव महादेव माने ,कोषाध्यक्ष राम सोमवशी , शिवराज पवार , गोर्वधन अतकरे , ज्ञानेश्वर सोमवसे,संजय पवार ,संतोष महाबोले, शिवाराम महाबोले यांनी केले आहे.