नळदुर्ग ,दि. ०८


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त कै.जीवनराव  यशवंतराव घुगे ( गुरुजी )यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त अणदूर  ता.तुळजापूर गावातील गणेश मंडळ,महिला बचत गट, व वंचित वस्तीवर ७५ राष्ट्रीय ध्वजांचे  मोफत वाटप 'घुगे परिवारांच्या' वतीने  करण्यात आले.  


यावेळी सर्वांना शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ध्वज फडकविण्यात यावा व सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीचा जागर करून देशाच्या अस्मितेचा गौरव करूया असे स्पष्ट केले.

यावेळी माजी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दिनकर घुगे, सामाजिक कार्यकर्ते आर. एस. गायकवाड मुंडेशा गोवे ,बालाजी कुलकर्णी ,राहुल राठोड, साहेबराव घुगे ,सर्जेराव घुगे,,कपिल घुगे, अनंत घुगे यांच्यासह घुगे परिवारातील सदस्य ही उपस्थित होते.
 
Top