तुळजापूर, दि. २९
तुळजापूर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेत हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने गरीब 100 विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले.
येथील विधीज्ञ जयवंत इंगळे यांच्या शुभहस्ते या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक आर बी एलगोंड, पर्यवेक्षक व्ही पी काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेचे क्रीडाशिक्षक एल एल आदटराव यांच्या नियोजनामधून हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.टी क्षीरसागर यांनी केले. प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक आर बी एल गोंड यांनी शिक्षणाच्या कामांमध्ये समाजातील विविध घटक वेगवेगळ्या मार्गांनी मदत करू शकतात. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना यामधून चांगली मदत मिळते. जे विद्यार्थी शिक्षणापासून आर्थिक अडचणीमुळे दूर राहतात त्यांना शिक्षण घेण्यासाठी अशा उपक्रमांची खूप मोठी मदत होते असे सांगितले.