काटी, दि.३१
तुळजापूर तालुक्यातील काटीच्या कन्या व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या क्रीडा शिक्षिका सौ.शामल माणिकराव शिंदे हंगरकर यांना दि.२९ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रातील मानाचा मेजर ध्यानचंद अवार्ड २०२२ हा मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
अजिंक्य क्रिकेट क्लब मार्फत आयोजित कै.आनंद बल्लाळ चिपळूणकर १३ वा पुरस्कार वितरण सोहळा क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल मेजर ध्यानचंद अवार्ड दिला जातो.या वर्षी सोमवार दि.२९ रोजी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरुनगर पिंपरी,पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पद्मश्री धनराज पिल्ले,पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा उपायुक्त विठ्ठल जोशी,क्रीडा अधिकारी अनिता केदारी, महाराष्ट्र हाकीचे मनिष आनंद,राष्ट्रीय प्रशिक्षक स्टन्ले डिसुझा,अजिंक्य क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष मनोज कदम,संघटन सचिव श्रीधरन तंबा, विष्णु चावरे,शर्मिला कदम,अनिता साळवी तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच श्रीधरन तंबा यांनी तर आभार मनोज कदम यांनी मानले.शामल शिंदे या रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा.अभिमान हंगरकर यांच्या भगिनी आहेत.या पुरस्काराबद्दल सौ.शामल शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे