लोहारा,दि. ३१

         
 महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी दादासाहेब रवळे यांची निवड करण्यात आली आहे. 
        

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलिप धोत्रे, मनसेचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, मनसेचे उस्मानाबाद  जिल्हासंघटक अमरराजे कदम, मनसेचे  जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे उस्मानाबाद  जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यांच्या हस्ते  पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत  रवळे यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
 
Top