काटी,दि.०१

तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील तीस वर्षांपासून  रुग्णसेवा देणारे सुप्रसिद्ध डॉ.युसुफ इनामदार यांचे गुरुवार दि.1 रोजी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान  निधन झाले. 


आजही गावखेड्यांत डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. अशाच प्रकारे मागील 30 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा देणारे डॉ. युसुफ इनामदार यांचे निधन जीवाला चटका लावणारे आहे.


त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळाले. कोविड काळात तर गावातील कोविड रुग्णांना योग्य डॉक्टरकडे पाठविणे,  पेशंट बरा होईपर्यंत चौकशी करणे,त्या पेशंटची  डॉक्टर चौकशी करणे, पेशंटकडे पैसै असो अथवा नसो रुग्णसेवेला  त्यांनी वाहून घेतले होते. मागील आठ महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बायबास सर्जरी झाली होती. त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांचेवर उपचार सुरु होते. अखेर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी पहाटे 1:30 वाजनेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता काटी येथील बसस्थानक शेजारील मुस्लिम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात येणार आहे.
        त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
         
 
Top