परंडा,दि.०१ :
सहा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास भर चौकात फासावर चढवण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध समितीने राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदारामार्फत निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ या गावातील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेने मानवतेला काळीमा फासला आहे .
गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा जरब राहिला नसल्याने आशा घटना घडत असाल्याचा अरोप अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बुधवार दि १ रोजी राष्ट्रपती यांना तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात केला आहे .
सहा वर्षीय मुलगी घराच्या पाठीमागे शेतात लघुशंख्येसाठी गेली असता नराधमाने पाठीमागून येऊन तिचा तोंड दाबुन तिला शेतात फरपटत नेऊन त्याच्यावर अत्याचार केला .
या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालूवुन आरोपीला फासावर लटकवले तरच अशा घटना डोके वर काढणार नाहीत . असे निवेदनात म्हटले आहे . पोलीस प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य पाहुन जलद गतीने दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत पाऊले उचलावीत, त्यासाठी आवश्यक ते पुरावे तात्काळ जमा करावेत, पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असेही नमुद केले आहे .
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक उस्मानाबाद, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परंडा यांना दिले आहेत.
या निवेदनावर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा सचिव फारूक शेख एमआयआमचे तालुका अध्यक्ष जमील पठाण, इरफान शेख, अजार शेख, अॅड नुरुद्दीन चौधरी , अॅड . जहीर चौधरी , अॅड . अजय खरसडे, जावेद पठाण ,आयुब जिनेरी , नसीर शाहबर्फीवाले, दत्ता मेहर, डॉ .अब्बास मुजावर ,समीर पठाण, सत्तार पठाण, मैनु तुटके, समीर पठाण, निसार मुजावर ,रफिक मुजावर, एजाज मुजावर, जावेद पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.