सिंदफळ घटनेतील आरोपीविरुध्द कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, 1 September 2022

सिंदफळ घटनेतील आरोपीविरुध्द कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी

वागदरी ,दि.०१ : एस.के.गायकवाड 
    
 तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ या गावांमध्ये  अल्पवयीन  मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी  आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना  निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे.
  

 तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ या गावांमध्ये ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटना समाजामध्ये नंतर घडणार नाहीत. या घटनेमुळे समाजामध्ये तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे. या आरोपीस तात्काळ फाशी होईल. या दृष्टीकोणातून शासन स्तरावर प्रयत्न व्हावे अशी मागणी  वंचित बहुजन आघाडी तुळजापूरच्या वतीने करण्यात आली आहे. 
  

यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते मिलिंद रोकडे,जिवन कदम,बाळासाहेब मुळे,राकेश जेठिथोर,शंकर गवळी,रामदास गोरे,कमलेश कदम,शुभम कदम,रोहीत शिंदे,नरेंद्र रोकडे,रवी साखरे,ज्ञानेश्वर बनसोडे,सोहेल तांबोळी आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages