तुळजापूर दि .८
येथिल युवा स्पंदन सामाजिक संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रोटरी क्लब तुळजापूर, शिवपार्वती मंगल कार्यालय यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ९ ऑगस्ट रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय तुळजापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास राष्ट्रीय ध्वज भेट दिला जाणार आहे. तसेच एक वर्षासाठी एक लाख रुपये अपघाती विमा दिला जाणार आहे. याशिवाय रक्तदात्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे लागेल तेव्हा कुटुंबातील आई-वडील पती-पत्नी आणि मुलांना मोफत रक्त पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती या निमित्ताने जगदीश पलंगे, सचिन घोडके, संजय जाधव ,महेंद्र कावरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.