काटी , दि.०७

तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील शिवरत्न  तरुण गणेश  मंडळाने  अनावश्यक खर्चाला फाटा देवुन गावातील अंधार दुर केले. पथदिवे बसवून  उजेड झाल्याने या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांतुन मंडळाच्या कार्यकर्त्यांचा  कौतुक केले जात आहे.



 ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याने येथील नागरिकांना अंधारामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत होता.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शिवरत्न गणेशोत्सव  मंडळातील सदस्यांनी एकमताने अनावश्यक खर्चाला फाटा देत गावात रोडलाईट बसवून उजेड करण्याचा निर्णय घेतला.व संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून गाव प्रकाशमय केले. 
      
या उपक्रमात शिवरत्न गणेशोत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल फंड, उपाध्यक्ष शहाजी कदम, सचिव अंकुश फंड, मंडळाचे आधारस्तंभ मदन  फंड,खजिनदार ब्रम्हदेव फंड यांच्यासह मंडळाचे सहाय्यक जितेंद्र फंड, पंडित फंड,जयदीप देशमुख,रणजित देशमुख्, बालाजी फंड,संदीप फंड,रोहित फंड,युवराज जाधव, प्रमोद देशमुख,सूरदर्शन देशमुख,विशाल पाटील,राहुल काशीद,श्रीधर फंड,सीताराम फंड,गोपाळ फंड
यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 
        या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून  कौतुक केले जात आहे.
 
Top