काटी, दि.०७

तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्यात येत आहे.

 
 गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गोंधळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असून इयत्ता पहिली  ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांची  गणित,वाचन व शुद्धलेखनाची स्पर्धा घेऊन या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या  प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यां विद्यार्थ्यांना तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


 त्याचप्रमाणे नागरिकांचे आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर' वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, तुळजापूर 'विभाग यांच्यामार्फत घेण्यात आले. यामध्ये श्रीमती उज्वला कवटेकर व अमोल घोरपडे यांनी सहकार्य केले.सदरील उपक्रमास गोंधळवाडीचे सरपंच  राजाभाऊ मोटे,उपसरपंच गोपाळ  मोटे,पोपटराव मोटे, माजी सैनिक संदिपान दुधाळ, शा.व्य.स.माजी अध्यक्ष संदिपान मोटे,माजी सरपंच  लक्ष्मी मोटे,शा.व्य.समिती अध्यक्ष गुलचंद माने,उपाध्यक्षा वर्षा मोटे, तसेच सार्वजनिक गणेश तरुण मंडळ अध्यक्ष  संजय मोटे, उपाध्यक्ष , उमेश मोटे, सचिव ,रोहन माने, माजी अध्यक्ष,  विठ्ठल मोटे,  अंकुश शिरगिरे तसेच मंडळातील सर्व सदस्य या
 सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
Top