मुरूम, ता. उमरगा, दि. ७ :
येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्वेता बापुराव पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता अंबर, महानंदा रोडगे, शाहिन तांबोळी, बेळंबचे सरपंच महानंद कलशेट्टी, उल्हास घुरघुरे, प्रा. करबसप्पा ब्याळे, विवेकानंद पडसाळगे, सुभाष कटाळे, प्रा. बबलू अंबर, राजू मुल्ला आदी उपस्थित होते. या रांगोळी स्पर्धेत २०१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम आलेल्या स्वाती वाकळे यांना ५००० रुपये, द्वितीय क्रमांक मिळालेल्या रोहिणी जामीनकर यांना ३००० रुपये, पायल वासुदेव तृतीय २००० हजार रुपये तर मनिषा धुमुरे यांना उत्तेजनार्थ २०१ रुपये बक्षीस श्वेता पाटील यांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू मुल्ला, हर्षवर्धन जाधव, निहाल महाबुसे व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.