कळंब, दि.१८

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सत्कारमूर्तींना गरज पडेल तेथे मी उभा राहीन, उस्मानाबाद  जिल्हा पुढे नेण्यासाठी सर्वांनी काम करावे, कळंब शेजारी 100 एकर नवीन एम. आय. डी. सी. निर्माण व्हावी. ज्यांना काही अडचणी येतील त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहीन असा विश्वास  आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.



  जनकल्याण अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमास  आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


कळंब येथे 1996 साली चेअरमन उमेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली  जनकल्याण अर्बन बँकेची स्थापना करण्यात आली. या बँकेचे हे पंचविसावे वर्ष असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला समर्थ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन ॲड मिलिंद पाटील,  जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन काळे, कळंब  तालुका अध्यक्ष अजित  पिंगळे हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.


सुरुवातीला  चेअरमन उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमांमध्ये प्रवीण झोरी, उदयकुमार माळेगावकर, रंगरेज रफिक इसाक, धनश्री जाधव, मनीषा कळंबे शिंदे, अकिब पटेल, रमेश आंबिरकर, किरण टेकाळे, स्वप्निल मांडवकर, रवी नरहिरे ,ऋषिकेश कुपकर, अशोक काटे, उत्कर्ष संगवे, दत्तात्रेय कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, निलेश होनराव, कल्याणी कोटुळे, गौरी देशमुख, नंदकिशोर मोरे, अशोक शिंदे, उन्मेश पाटील, विलास मुळीक, ॲड दत्तात्रेय पवार, डॉ. रामकृष्ण लोंढे, संजय चिंचकर, डॉ. धीरज मानकरी, डॉ विश्वास कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


यावेळी सत्कारमूर्तींपैकी रवी नहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी उपस्थितांचे आभार  करसन पटेल यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक राजेंद्र दीक्षित, शरणाप्पा मानकरी, विजयकुमार पाटील, सुधीर धोकटे, ॲड पांडुरंग पाटील, महेश जोशी, संदीप बावीकर, राजेश पारख ,अशोक शिंपले, अरुण जोशी,  वैशाली कुलकर्णी, योगिनी आवाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथ पेकमवार उपस्थित होते. 
 
Top