काळेगाव,दि.१८:
तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे जनावराना मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन काळेगाव येथे जनावराना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. डॉ. रेड्डी,डाॅ. खरोसे डॉ. दिवाने, डॉ. वागतकर, परिचर राठोड, मुंडे, शेख यांनी लसीकरण केले. यावेळी गावातील सर्व पशुपालकांनी आपापल्या जनावरांना घरी, शेतात लसीकरण करून घेतले, यावेळी गावातील उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, ग्रामसेविका शेख, ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे, प्रकाश साखरे आदीसह पशुपालक शेतकरी उपस्थित होते.