काटी,दि.१२:
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ओम साई हॉस्पिटल व व्यसन मुक्ती केंद्राचे डॉ.रमेश लबडे यांची औरंगाबाद येथील बैठकीत शनिवार रोजी ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर असोशियन इंडियाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे व डॉ. दीपक पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यापूर्वी त्यांना अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . याची दखल घेऊन या संघटनेने त्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल मंगरूळसह परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी डॉ.शुभांगी रत्नपारखी, डॉ. संदीप राठोड,यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होते.