काटी,दि.२०

तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारात शिवार फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने रविवार 17 सप्टेंबर रोजी पद्मश्री डॉ. के.एच.घरडा जेष्ठ शास्त्रज्ञ यांचे शेती क्षेत्रातील योगदान व यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी शिवार फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करून आपली स्वतःची , आपल्या परिसराची व देशाची प्रगती साधून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले.


शिवार  फाउंडेशनच्या वतीने शेतीविषयक अभ्यास वर्ग , संशोधन, मार्गदर्शन शिबिर व विविध प्रात्येक्षिक जागेवर करून दाखवण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास 300 स्वयंसेवक संस्थेच्या वतीने कायम कार्यरत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी १७ एकर क्षेत्रावर 2000 विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
   


यावेळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद , सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे , शिवार फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हेगाणा, भारतीय जनता पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, अँड. एन.डी. चौगुले,  जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे,  आबासाहेब सरडे , धनराज धुरगुडे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी-पाटील, गणेश सरडे,धुरगुडे, ज्ञानेश्वर सरडे पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी, पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील संघटना व शिवार फाऊंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top