नळदुर्ग , दि. २१ : प्रा दिपक जगदाळे
महाविद्यालयीन विद्यार्थाना नौकरीच्या मागे न लागता व्यवसायात देखील आपले करीयर करता यावे ,हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान विभागातील मत्स्यशास्त्र ( Fishery Science ) या विषयातील विदयार्थ्यांच्या एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूर ता तुळजापूर येथील प्रगतशील शेतकरी संजय पवार यांनी यावर्षी आपल्या शेतातील एक एकर जागेमध्ये पर्ल कल्चर ( मोती संवर्धन ) ची शेती करण्यास सुरुवात केली आहे . या शेतीच्या उत्पादनातून त्यांना यावर्षी लाखो रुपयांचे उत्पादन मिळाले आहे .
याप्रसंगी संजय पवार यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसायातून देखील आर्थिक प्रगती साधली जाऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ समीर पाटील , डॉ हंसराज जाधव , डॉ दिपक जगदाळे , डॉ महेश मोटे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.