चिवरी, दि.१८: राजगुरू साखरे 

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात जुलै महिन्यापासून पडत असलेला सततचा पाऊस, शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे, सोयाबीनसह खरीप पिकांचे  नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चिञ आहे,



त्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देईल असे वाटत असतानाच अनुदानाच्या पहिल्या यादीत तुळजापूर तालुक्यातील फक्त   एका महसुल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे, उर्वरित महसुल मंडळे वगळण्यात आली आहे.त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन नळदुर्ग  मंडळातील  चिवरी  परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चिवरी येथील चेअरमन बालाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुळजापूर तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
Top