तुळजापूर, दि.१८ डॉ. सतीश महामुनी
शारदेव नवरात्र महोत्सवाच्या अगोदर होणारी तुळजाभवानी देवीची घोरनिद्रा शनिवारी रात्री सुरू झाली असून पुढील नऊ दिवस तुळजाभवानी देवी भाविक भक्तांना निद्रा रूपात दर्शन देणार आहे. परंपरागत पद्धतीने आणि आई राजा उदो उदो जयघोषात तुळजाभवानी देवीचा मंचकी निद्रा कार्यक्रम संपन्न झाला.
शारदीय नवरात्राच्या अनुषंगाने कालाष्टमीच्या मुहुर्तावर महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानीच्या 9 दिवसीय मंचकी निद्रेस शनिवार सायंकाळी प्रारंभ झाला.सायं 6.30 वाजता अभिषेक घाट होऊन नित्यनेमाने देवीस पुजेसाठी हाक मारण्यात आली.सिंहासनावरील मेन भोपे पुजारी यांनी काढून निर्माल्य विसर्जन केले.
सात वाजता भोपी पुजाऱ्यांनी पंचामृत व शुद्धजल स्नान घालुन मेण काढणे विधी करण्यात आला.यानंतर शासकीय आरती व मानाची आरती होऊन नैवेद्य दाखविण्यात आला. या विविध विधी नंतर सिंहासनावरून देवीच्या मुर्तीस उपस्थित भोपीपुजारी बांधवांनी निद्रेसाठी मंचकी आणले.यावेळी तहसिलदार योगिता कोल्हे.धार्मिक व्यवस्थापक विश्वास कदम, नागेश शितोळे,सिद्धेश्वर इंतोले,देविचे महंत चिलोजीबुवा,तुकोजीबुवा,हमरोजीबुवा,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,सुधीर कदम,संजय कदम,अवि मलबा,सार्थक मलबा,
पाळीवाला भोपेपुजारी बाळकृष्ण कदम,समाधान कदम,सचिन कदम,अतुल मलबा,सचिन पाटिल,
दिनेश कदम,संजय सोंजी, सेवेकरी व कर्मचारी यांनी आई राजा उदो उदो चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण केली व तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला.
देवीच्या निद्रेनंतर शासकीय आरती व मानाच्या आरत्या धुपारती नैवेद्य हे विधी पार पडले.प्रक्षाळ पुजा ,नैवद्य हे विधी झाल्यानंतर शेजारती झाली.सेवेकरीपलंगे,पवेकर ,छत्रे ,चोपदार ,गोंधळी , इ.जणासह पोलिस-सुरक्षा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.