नळदुर्ग, दि.०४

 शहरातील भुईराज सांस्कृतिक तरुण गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव  कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


  दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त समाजातील शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर  मंगळवार दि.६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता लहान मुलांचे खेळ व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धासह इतर स्पर्धा होणार आहे. बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता कुमारी नम्रता शिवाजी नकाते यांचे प्रवचन व रात्री भजन, गुरुवारी दि. ८ सप्टेंबर रोजी दहा ते बारा वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्धघाटक  म्हणुन डॉ. सिद्रामप्पा खजुरे, डॉ. प्रकाश नलवडे, डॉ. सत्यजित डुकरे, डॉ. एम.एम. शेख, डॉ. आनंद काटकर, आदि उपस्थित राहणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वाती शाहा यांचे व्याख्यान होईल. यावेळी मान्यवराचे  सत्कार  होणार आहे. 

शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गुलालाचा कार्यक्रम दयानंद पुदाले यांच्या शुभहस्ते होऊन विसर्जन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

कार्यक्रमासाठी भोई समाज पंचकमेटीचे अध्यक्ष सुनिल उकंडे, उपाध्यक्ष दिपक डुकरे , भानुप्रकाश पुदाले ,कोषाध्यक्ष रवी सुरवसे , सदस्य सचिन भोई , सागर कौरव, भोईराज गणेश मंडळाचे अध्यक्ष धनंजय डुकरे, उपाध्यक्ष संदिप  पुदाले,संदिप गायकवाड , कोषाध्यक्ष अभिजीत पुदाले , सचिव शिरीष डुकरे, अतिष डुकरे , मिरवणुक प्रमुख अमर डुकरे, अनंद पुदाले , अजय दासकर ,अजय डुकरे, प्रविण दासकर , 
 आदीसह मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक, कार्यकर्ते यानी पुढाकार घेतले आहे. 
 
Top