काटी, दि. ०५
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात सोमवारी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
.प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पूजन करणेत आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी क्षीरसागर यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी सर्व शिक्षक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक अण्णा कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,महादेव शेंडगे,अशोक बनकर,अण्णासाहेब मगर ,अनिल घुगे,हरीश मगदूम,दयानंद भडांगे,संतोष बनसोडे,बालाजी क्षीरसागर,किरण चव्हाण,फुलाजी तातीकुंडलवार,रमाकांत पवार,खंडू काळे,दत्ता भोजने,कोंडीबा देवकर,यशवंत निंबाळकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन सूत्रसंचालन विद्यार्थिनी संगीता विभुते हिने तर आभार विद्यार्थिनी भीमाबाई कोंडरू हिने मानले.