काटी,दि.०५
तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तामलवाडीसह गणातील पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द,देवकुरुळी,सुरतगाव,सांगवी (काटी) या गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा, त्याचबरोबर सरस्वती विद्यालय तामलवाडी, नरेंद्र बोरगांवकर विद्यालय देवकुरुळी, छत्रपती शिवाजी विद्यालय पिंपळा खुर्द या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम भाऊ,सोपान कदम, तानाजी पाटील, देवकुरुळी उपसरपंच नवगिरे, आदिनाथ जाधव, अजय पाटील, मिलिंद मगर, विश्वास मगर,राम गुंड, सुरतगावाचे उपसरपंच बाबासाहेब गुंड, महेश नकाते, मारुती रोकडे, समीर शेख, शोयेब शेख, बालाजी चुंगे, पिंपळा बू चे उपसरपंच विजय जाधव, सिताराम पाटील, संग्राम पांढरे, शशिकांत कदम, लखन कदम,निवांत शेळके आदी उपस्थित होते.